एमटीडीसी माथेरान

महाराष्ट्र, माथेरान
गिरीस्थान
निसर्ग

एमटीडीसी माथेरान

महाराष्ट्र
गिरीस्थान
निसर्ग

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

पश्चिम घाटावरील सयाद्री पर्वतांच्या कुशीत वसलेल्या माथेरानची सफर तुम्हाला निसर्गाच्या जवळ घेऊन जाते यात काही शंका नाही. 2600 फूट उंचीवर, मुंबईपासून अवघ्या 100 किलोमीटरवर हे थंड हवेचं पर्यटन आकर्षण स्थित आहे. माथेरान या शब्दाचा अर्थच मुळात माथ्यावरील रान असा होतो ज्यावरून तुम्ही येथील हिरवळीचा अंदाज घेऊच शकता. वाहनांना परवानगी नसलेल्या या पर्यटन स्थळी प्रवेश करताच आपल्याला प्रदूषणमुक्त वातावरणाची अनुभूती होईल.

लाल मातीचे रस्ते, सभोवताली हिरव्यागार टेकड्या, प्रदूषणाविरहीत गार वारा यामुळे पर्यटक वर्षभर माथेरानला गर्दी करतात. माथेरान मध्ये घोडेस्वारी, पायवाटांवरून निवांत भटकंती आणि सूर्योदय-सूर्यास्त पॉईंट्सना भेट दिल्याशिवाय ही सफर पूर्णच होऊ शकत नाही.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

माथेरानच्या पायथ्याशी दस्तुरी नाक्याजवळ वसलेले एमटीडीसी रिसॉर्ट हे प्रसिद्ध टॉय ट्रेन स्थानकापासून 2.5 किमी अंतरावर आहे. सर्व सुख सुविधांनी समृद्ध असलेल्या आमच्या रिसॉर्ट मध्ये येऊन तुम्ही निश्चिन्तपणे तुमच्या माथेरान मधील सुट्टीचा आनंद घेऊ शकता. निसर्गाच्या कुशीत वसलेला हे रिसॉर्ट म्हणजे शहरातील गर्दी आणि सिमेंटच्या जंगलापासून काही काळ दुर जाऊन एखाद्या सुंदर परिसरातील शांतता अनुभवण्याची उत्तम सोय म्हणता येईल.

34.2°C

Clear

उत्तम ठिकाण

रिसॉर्ट प्रसिद्ध दस्तुरी नाक्याजवळच असल्यामुळे येथे पोहचणे सहज शक्य आहे.

खेळायला जागा

आपल्या मुलांना खेळण्यासाठी आणि मौज-मस्ती करण्यासाठी प्रशस्त आणि सुरक्षित जागेची सोय येथे केलेली आहे.

माऊंटन स्पाईस उपहारगृह

रिसॉर्टच्या बाहेर न पडता स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आणि वैविध्यपुर्ण चविष्ट पदार्थांचा आस्वाद तुम्हाला घेता येईल.

नयनरम्य हिरवळ

रिसॉर्टमधून दिसणारे अरण्य व हिरवळ अगदी मनाला वेड लावणारे आहे.


चेक इन30/03/2025
चेक आउट31/03/2025

Adults

Ages 13 or above

1

Rooms

1

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

इंटरकॉम सुविधा
पार्किंग
रूम सर्व्हिस
वायफाय
2 मुलांची उद्याने
24 तास सुरक्षा
उपहारगृह
शनिवारी साप्ताहिक खेळांचे उपक्रम
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • इंटरकॉम सुविधा
    • पार्किंग
    • रूम सर्व्हिस
    • वायफाय
    • 2 मुलांची उद्याने
    • 24 तास सुरक्षा
    • उपहारगृह

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

  • पत्ता : एमटीडीसी रिसॉर्ट, माथेरान दस्तुरी नाका, फॉरेस्टिंग पार्किंग जवळ, माथेरान, ता. कर्जत, जि. रायगड- ४१०१०२
  • मोबाईल क्रमांक  :  8554040262
  • ईमेल आयडी :  matheranmtdc@maharashtratourism.gov.in
कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (91.8 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: माथेरान (2.3 किमी)

पत्ता : एमटीडीसी रिसॉर्ट, माथेरान दस्तुरी नाका, फॉरेस्टिंग पार्किंग जवळ, माथेरान, ता. कर्जत, जि. रायगड- ४१०१०२

मोबाईल क्रमांक : 8554040262

ईमेल आयडी : : matheranmtdc@maharashtratourism.gov.in



Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

लुइसा पॉईंट

4.4 किमी

लुइसा पॉईंट

विविध डोंगर आणि शार्लोट तलाव पाहण्यासाठी लुइसा पॉईंट हे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध ठिकाण आहे.

शार्लोट लेक

4 किमी

शार्लोट लेक

तलावाकाठी शांत एक दिवसीय सहल करण्याचा तुमचा बेत असेल तर सुंदर सूर्यास्ताचा नजारा दर्शवणारे शार्लोट लेक एक उत्तम ठिकाण आहे.

मंकी पॉईंट

1 किमी

मंकी पॉईंट

माकडांच्या नावाने ओळखला जाणारा हा मंकी पॉईंट दऱ्या-खोऱ्या आणि निसर्गाने भरपूर आहे. या ठिकाणावरुन दोधानी गावाचा सुंदर नजारा दिसतो.

शिवाजी महाराजांची लॅडर

950 मी

शिवाजी महाराजांची लॅडर

छत्रपती शिवाजी महाराज जिथून अनेकदा प्रवास करत होते अशा पाऊलवाटेवरून आपणही ट्रेक करून एक अद्भुत अनुभव घेऊ शकता, ही वाट दुतर्फ़ा हिरवळीने समृद्ध आहे.

एमटीडीसी मध्ये आपले स्वागत आहे!

रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सूचित केलेल्या स्थानिक कोविड-19 निर्बंधांचे पालन करत सर्व पर्यटकांना विनंती आहे की आपले पूर्णपणे लसीकरण झाले असल्यासच एमटीडीसी माथेरान रिसॉर्ट येथे बुकिंग सुरू ठेवावे. तसेच आपणास विनंती आहे की चेक-इनच्या वेळी रिसॉर्ट अधिकाऱ्यांना आपले योग्य लसीकरण प्रमाणपत्र प्रस्तुत करावे. सदरच्या नियमांचे पालन न केल्यास, स्थानिक आदेशानुसार दंड आकारला जाईल.