एमटीडीसी तारकर्ली

महाराष्ट्र, तारकर्ली
समुद्रकिनारे
निसर्ग

एमटीडीसी तारकर्ली

महाराष्ट्र
समुद्रकिनारे
निसर्ग

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

जर समुद्रकिनाऱ्यावर एका मस्त सुट्टीचा आनंद लुटायचा विचार करताच 'क्वीन बीच ऑफ कोकण' अशी ओळख असलेला तारकर्ली हा पर्याय प्रत्येकाच्या डोक्यात येतोच. हा समुद्रकिनारा स्वच्छ व येथील पाणी इतके नितळ आहे की आपण पाण्याखालील निदान 20 फूट खोल नजारा सहज पाहू शकाल. सूर्यास्ताच्या लालकेशरी उन्हात चमचमत्या रुपेरी वाळूवर नुसतं चालणं हा सुद्धा एक सुखद अनुभव ठरतो, आणि जर का आपल्याला काहीतरी साहसी करण्याची इच्छा असेल तर स्कुबा डायव्हिंग, स्नोर्कलिंग आणि पॅरासेलिंग सारख्या साहसी जलक्रीडांचे पर्याय आपल्याला अगदी कमी खर्चात इथे उपलब्ध होतील. आता राहिला प्रश्न पोटपूजेचा तर मालवणात आलात आणि मासोळीच्या कालवणावर ताव मारला नाहीत असं होऊ तरी शकेल का? तारकर्ली मध्ये जागोजागी अस्सल मालवणी खानावळी व उपहारगृह आहेत. कारवणे वाडी या खानावळीत तर पर्यटकांच्या रांगा लागतात, आपणही हा अनुभव चुकवू नका. वेळ असल्यास तारकर्लीहुन पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला सुद्धा आपण भेट देऊ शकता.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

समुद्रकिनारी स्थित तारकर्ली येथील एमटीडीसी रिसॉर्टमध्ये केवळ समुद्राचा नजारा नाही तर इतर अनेक सुखसोई आपल्यासाठी उपलब्ध आहेत. रुपेरी वाळूत, किनाऱ्याजवळ बांधलेल्या कुटीमध्ये बसून तुम्ही थंडगार वाऱ्याच्या झुळूकांचा आनंद घेत विश्रांती घेऊ शकता. डोक्यावर निळं आकाश आणि पायाखाली निळाशार समुद्र या सुंदर वातावरणाला अधिकच साज चढवणारा , एक खाजगी स्विमिंग पूल देखील या रिसॉर्ट मध्ये आहे. रिसॉर्ट मध्ये असलेल्या कोरल उपहारगृहात आपल्याला कोकणी मेजवानीचा आस्वाद घेता येईल.

Scuba Diving

Discover the underwater world at one of the best diving facilities in the state, minutes away from the resort.

Tarkarli Beach

The resort is minutes away from the serene beach which is also known as the 'Queen Beach of the Konkan'.

Unique Stays

With one-of-a-kind Bamboo Houses that overlook the blue waters of the sea, your stay is sure to be memorable.

Coral Restaurant

Enjoy the relishing local cuisine without having to leave the resort.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

इंटरकॉम सुविधा
पार्किंग
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • इंटरकॉम सुविधा
    • पार्किंग

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः डाबोलिम विमानतळ, गोवा (133 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: कुडाळ (40 किमी)

पत्ता : मु. पो. वायरी भूतनाथ, मालवण, जि. सिंधुदूर्ग-४१६६०६

ईमेल आयडी : : tarkarlimtdc@maharashtratourism.gov.in, roratnagiri@maharashtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः डाबोलिम विमानतळ, गोवा (133 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: कुडाळ (40 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Sindhudurg Fort

8 किमी

Sindhudurg Fort

Built by Chhatrapati Shivaji Maharaj, the Sindhudurg Fort is a true symbol of the Indian warrior’s revolutionary mindset. The architectural wonder is located off the Malvan coast on Khurte island in the Arabian Sea.

Kolamb Beach

10.5 किमी

Kolamb Beach

A serene beach with clean waters, great for watching the sunset.

Tarkarli Beach

500 मी

Tarkarli Beach

Immerse yourself in the tranquility of Tarkarli where you can experience swooshing waves and tropical coral reefs. It won’t be too hard to spot the swirling barracuda, giant squids, and turtles gliding by.

Bhogwe Beach

29.5 किमी

Bhogwe Beach

One of the cleanest and well-maintained beaches in the area with watersports and fresh seafood.