आमच्याबद्दल)

एमटीडीसी बद्दल (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही महाराष्ट्रातील पर्यटनाच्या विकासासाठी समर्पित एक जबाबदार सरकारी संस्था आहे. राज्यभरातील अनेक पर्यटक निवास आणि उपहारगृहांचे व्यवस्थापन एमटीडीसी द्वारे कार्यक्षमतेने हाताळले जाते. सहलीच्या चित्तवेधक पॅकेजेस सोबतच ऐतिहासिक स्थळांची भ्रमंती, साहसी खेळ, समुद्री खेळ असे अनेक थरार अनुभवण्याची तसेच राज्याला लाभलेली समृद्ध देणगी जवळून पाहण्याची सुवर्णसंधी पर्यटकांना देण्याचे मोलाचे कार्य एमटीडीसी कित्येक वर्ष यशस्वीरीत्या करत आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपत, आमचे रिसॉर्ट्स पर्यटकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देतात. या रिसॉर्ट्स मध्ये नेत्रसुखद नजारे, कक्षांमध्ये सुखदायी निवासापासून ते त्या त्या ठिकाणांच्या खाद्यसंस्कृतीचा अनुभव देणाऱ्या मेजवानीचा आस्वाद घेण्यापर्यंत परिपूर्ण अनुभव पाहुण्यांना दिला जातो. निवांत समुद्रकिनारे व मोहक पर्वतरांगांमधील शांतता अनुभवण्यासाठी तसेच राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आध्यात्मिक तर जंगल सफारीतुन साहसी आनंदघेण्यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत. या प्रत्येक आम्हाला सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की आम्ही पर्यावरणाचे संवर्धन करतानाच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पर्यटक निवासांचे कार्य करतो. प्रत्येक पाहुण्याला एक आनंददायी अनुभव देण्याच्या आमच्या प्रयत्नात आम्ही स्थानिकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतो.

29 पर्यटक संकुल

नमस्कार! आपले स्वागत आहे - आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा पाहुणचार अनुभवण्यासाठी हीच सुयोग्य वेळ आहे.

27 उपहारगृहे

कोथिंबिर वडी, बोंबिल, केरी आमटी, थालिपीठ आणि बरेच काही - राज्यभरातील एमटीडीसी उपहारगृहांमधील अशी असंख्य सुग्रास पक्वान्ने तुमच्या रसनेला नक्कीच सुखावतील.

3 जलक्रीडा केंद्रे

निसर्गाच्या सानिध्यात जलक्रीडेचा थरार! राज्यातील सर्वात निसर्गरम्य जलाशयांमध्ये साहसी खेळांचा अनुभव घ्या!

25 अनोखे अनुभव

साहस, संस्कृती, मौज-मस्ती आणि बरेच काही - महाराष्ट्राच्या विविध वैशिष्ट्यछटांचे दर्शन घडवणारे निवडक अनुभव. खास तुमच्यासाठी, चला पाहूया!

What We Do

आम्ही केवळ रिसॉर्ट्सच नव्हे तर अनेक मुख्य ठिकाणी उपहारगृहे सुद्धा स्थापन केली आहेत, ज्यामुळे मोहक निसर्गासह स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी आपल्याला मिळेल. राज्यातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळी रिसॉर्ट्सची स्थापना करून प्रत्येक पर्यटकाचे पर्यटन स्वप्न पूर्ण करण्याचा आणि तो अनुभव अविस्मरणीय आणि सुंदर व्हावा असा आमचा प्रयत्न व हेतू आहे.

शाश्वत जीवनशैली

आमच्या 29 रिसॉर्ट्सद्वारे प्राप्त होणारा संपूर्ण नफा हा या रिसॉर्ट्सचा आणखी विकास करण्यासाठीच समर्पित केला जातो. हे रिसॉर्ट्स पर्यटकांसाठी व पर्यावरणासाठी एक वरदान ठरतील यासाठी आमची संपूर्ण संस्था जीव ओतून काम करत आहे. रिसॉर्ट्सची बांधणी किंवा विकास करत असताना तेथील मूळ नैसर्गिक निवासस्थानांची कोणतीही हानी होणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेतो.

स्थानिकांचे सशक्तीकरण

आम्ही एक सरकारी संस्था म्हणून काम करत असताना स्थानिकांना रोजगार देण्याच्या हेतूने रिसॉर्ट्स चालवण्याची मोठी संधी उपलब्ध करून देतो.हे करत असतानाच आत्मनिर्भर आणि पर्यावरणास अनुकूल जीवनशैली निर्माण करण्यासाठीचे हे एक पाऊल आम्ही उचलले आहे.

आदरातिथ्य प्रथम

उत्कृष्ट ग्राहक सेवा देणारी संस्था ही आतिथ्यशीलतेच्या विश्वात एमटीडीसीची ओळख आहे, आम्हाला हे सांगण्यास खूप अभिमान वाटतो की आम्ही पर्यटकांना नेहमी लक्षात राहील असा आनंदी अनुभव देण्याचे काम आजवर यशस्वीरीत्या पार पाडत आलो आहोत. आमच्या अनेक रिसॉर्ट्समध्ये खास आणि ख्यातकीर्त उपहारगृहे आहेत ज्यामध्ये स्थानिक पदार्थांसह विविध खाद्यशैलीच्या पदार्थांचे पर्यायही उपलब्ध आहेत.

महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा एकमेव ध्यास!

एमटीडीसी ही संपूर्णतः शाश्वत जीवनशैली जगण्याच्या दिशेने वाटचाल करत काम करणारी सर्वात जुन्या संस्थांपैकी एक असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खाद्यसंस्कृती, संगीत-नृत्य रूपातील कला या व अशा अनेक माध्यमातून मिळालेला महाराष्ट्राचा वारसा जपत आपली संस्कृती जगभर पोहचवण्याचा हा ध्यास आहे. जगाला महाराष्ट्राचे पैलू दाखवून आपल्या वारसा आणि मूल्यांची ओळख व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे.

संचालक मंडळ

Jayshree Bhoj, IAS

Managing Director of MTDC