एमटीडीसी बोट क्लब नाशिक

गंगापूर धरण, नाशिक, महाराष्ट्र

एमटीडीसी बोट क्लब नाशिक

गंगापूर धरण, नाशिक, महाराष्ट्र

नाशिक येथील एमटीडीसी बोट क्लबचे 2020 मध्ये उद्घाटन झाले आणि अल्पावधीतच ते पर्यटक व स्थानिकांना एक अनोखा अनुभव देणारे आकर्षण झाले आहे. अवघ्या वर्षभरातच, हे ठिकाण नाशिक मधील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरले आहे.. भव्य एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्टच्या अगदी जवळ स्थित हा उपक्रम साहसी खेळांचे केंद्र असल्याने नेहमीच्या कंटाळवाण्या जीवनाला पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर व जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक या क्लबला भेट देत असतात. 


बोट क्लब तर्फे आपल्याला पुरवल्या जाणाऱ्या बोटिंग अनुभवांमध्ये अनेक पर्यायही उपलब्ध आहेत, जेट स्की वरून वेगाने सफर करत शुद्ध ताजी हवा उरात भरून घेणे असो वा बम्पर बोट मधून पाण्यात फिरताना तुमचं बालपण पुन्हा अनुभवायचे असो, याशिवाय व्हर्लपूल, बनाना बोट असं सर्व काही एकाच ठिकाणी करण्याची सोय या बोट क्लबने आपल्यासाठी उपलब्ध केली आहे.. हा थरारक अनुभव घेतल्यावर तुमच्या मित्रांसह बसून निसर्गाचे विहंगम दृश्य पाहत सूर्यास्ताच्यावेळी तलावातून फेरी मारत तुम्ही ही सहल पूर्ण करू शकता. 


हवाई मार्गे:

नाशिक विमानतळ (35 किमी) 

रेल्वे मार्गे:

नाशिक रोड रेल्वे स्थानक अवघ्या 5 किमी वर आहे. 


फोटो गॅलरी

सोयी सुविधा

पार्किंग
स्नानगृह
उपहारगृह
पोशाख बदलण्याची खोली

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

कसे पोहचाल?

हवाई मार्गे:

नाशिक विमानतळ (35 किमी) 

रेल्वे मार्गे:

नाशिक रोड रेल्वे स्थानक अवघ्या 5 किमी वर आहे. 

उपक्रम

एमटीडीसी बोट क्लब मध्ये खालीलपैकी कितीही आणि कोणतेही अनुभव आपण निवडू शकता:

  • जेट स्की
  • बनाना बोट
  • स्पीड बोट
  • बम्पर राईड
  • कायकिंग
  • पार्टी बार्ज
  • लेक सफारी
  • सनसेट सफारी
  • सूर्यास्ताच्यावेळी क्रूज सफर (सनसेट लेक क्रूज)
  • व्हर्लपूल

खवय्येगिरी

साहसी खेळ खेळून थकल्यावर आमच्या उपाहारगृहांमध्ये खवय्यांसाठी खालील पदार्थ उपलब्ध आहेत: