एमटीडीसी तारकर्ली IISDA

तारकर्ली

सविस्तर 

एमटीडीसीचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड एक्वाटिक स्पोर्ट्स (IISDA) हा भारतातील जागतिक दर्जाचा उपक्रम मानला जातो. देशातील मोजक्याच (पीएडीआय) पाडी 5 स्टार प्रमाणित डायव्हिंग केंद्रांपैकी एक असे हे ठिकाण जागतिक दर्जाच्या सुविधा, प्रशिक्षक आणि अत्याधुनिक उपकरणे यांसह सुसज्ज आहे. IISDA मधून मागील 5 वर्षांमध्ये हवाई दलाच्या 500 पेक्षा अधिक जवानांनी स्कुबा डायव्हिंग अभ्यासक्रम पूर्ण केल्याचा आम्हास अभिमान आहे. 


एमटीडीसी तर्फे तारकर्ली येथे डायव्हिंगकेंद्र व निवासासाठी रिसॉर्ट अशा दोन्ही सुविधा असल्याने साहसी तरुणाई सोबतच कौटुंबिक सहलीसाठी सुद्धा हे ठिकाण अगदी उत्तम ठरते. आपण तारकर्ली मध्ये पर्यटनाचा परिपूर्ण अनुभव घेऊ शकता. 27 फूट स्कूबा डायव्हिंग पूल मध्ये अद्ययावत नवीनतम उपकरणांसह डायव्हिंग, आधुनिक ऑडिओ-व्हिज्युअल यंत्रणेसह प्रशिक्षण पासून ते अगदी समुद्रकिनाऱ्यावर विश्रांतीसाठी कुटी व चौपाटीवरील उपहारगृहात मनसोक्त मेजवानीचा आनंद लुटण्यापर्यंत एकूण पुरेपूर मज्जा आपल्याला इथे करता येते.


तारकर्ली येथील समुद्राचे वैशिष्ट्य असे की, अरबी समुद्रातील अनेक दुर्मिळ मासे आणि प्रवाळांसह वैविध्यपूर्ण सागरी जीवांचे हे निवासस्थान आहे, त्यामुळे तुमच्या तारकर्ली भेटीत या कधीही न पाहिलेल्या प्राण्यांचे दर्शन घेता येते. आपल्याला पोहता येत नसेल किंवा यापूर्वी कधी डायव्हिंग केले नसेल आणि तरीही 

तुम्ही IISDA मध्ये अगदी प्राथमिक अभ्यासक्रमात नावनोंदणी केली तरी काही दिवसात आपण एक औपचारिकरित्या प्रशिक्षित, प्रमाणित डायव्हर बनू शकता. डायव्हिंग क्षेत्रात नवशिक्यापासून ते तज्ज्ञ बनण्यापर्यंतचा प्रवास अगदी हसत खेळत पार करता येतील असे आमचे इथले अभ्यासक्रम अवश्य तपासून पहा.
भारतातील प्रमुख डायव्हिंग साइटपैकी एक


6 ते 40 मीटर


3 ते 20 मीटर


27 ते 30 अंश


फोटो गॅलरी

सोयी सुविधा

पार्किंग
गियर भाड्याने
हॉटेल रूम
बीच-तोंड रेस्टॉरंट

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

पीएडीआय (पाडी) प्रमाणित 5 स्टार डायव्हिंग केंद्र

विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध

स्थान -

भारतातील प्रमुख डायव्हिंग साइटपैकी एक

खोली -

6 ते 40 मीटर

दृश्यमानता -

3 ते 20 मीटर

तापमान -

27 ते 30 अंश

सोयी सुविधा

  • पूर्णपणे सुसज्ज डायव्हिंग केंद्र
  • आरामदायक खोल्या
  • चौपाटीवरील उपहारगृह
  • जलतरण तलाव
  • पार्किंग